९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सातारा येथील कविता कट्ट्यावर सादरीकरण केलेली कविता:-
काळ
(वृत्त:भुजंगप्रयात)
कसा काळ हा एकटा शक्तिशाली
कुणाची न त्याने कधी कीव केली..
असो धाकला थोरला बंधु कोणी
कुणाची न पर्वा न कोणास जाणी..
पहाण्या न जाई कुठे कोण आहे
घडा पूर्ण पाहून फोडीत राहे…
असो राव वा दीन कोणी भिकारी
जशी वेळ ज्याची तयाचा शिकारी..
बळे ना कधी लागतो पाठिमागे
भितीने तयाच्याच हे विश्व जागे..
जशा एक होतात त्या काळवेळा
तयांचा तिथे संपतो कुंभमेळा…!
***************************
किरण जोशी, दिघी, पुणे
***************************
Share This Post
