सेल फोन

मी धंद्यात असल्यामुळे, माझा पहिला ४० वर्षांपूर्वी घेतला. त्या मोटोरोला फोनचे  त्याच्या बॅटरीसकटचे वजन २ किलो असावे. वापरताना मला दोन् हात वापरावे लागत. हळू हळू नवीन फोन येत गेले आणि त्यांचे वजन घटत आता काही ग्राम झाले आहे. माझे वजन जर असे घटले असते तर फार बरे झाले असते, असो, पूर्वी हमीदाबानु दिसणारा फोन आता करीना कपूरसारखा 0 फिगर दिसू लागला आहे. त्या वेळी फोनचे काम फोन म्हणूनच होते. त्यावर बोलणे ही एकच प्रक्रिया होत असे. फोन मध्ये दोन चार वर्षाने सुधारणा होत असे, मगच नवीन फोन घेणे होत असे. आता दर वर्षी नवे मॉडेल येते आणि आणि तो घेण्यात चढाओढ सुरू होते.   

परवाच मी नवीन फोन घेणार जाहीर केले. फोन बद्दलचे माझे ज्ञान आगाध आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे, माझे समवयस्क मित्र सोडून, माझ्या मुली, माझे तरूण विद्यार्थी, एवढच काय तर माझा १० वर्षाचा नातवासकट सगळे मला सल्ला द्यायला सज्ज झाले. सल्ला देणाऱ्यात दोन तट आहेत, एक अँन्ड्रॉईड आणि दुसरे अॅपलवाले. जणू ट्योटा का होंडा हा वाद रंगू लागला. मी मात्र कोणता फोन स्वस्त असेल याकडे पहात होतो. 

 तसे पहिले तर आजकाल नवीन फोन घेणे म्हणजे नवीन कार घेण्यासारखा सोहळा असतो. मी आमची सहचारिणी आणि संगीता पॉश मॉल मध्ये गेलो. मी प्रथम दिसलेल्या फायडोच्या दुकानाकडे वळलो. तोच माझ्या मुलीने माझी कॉलर पकडून मला मागे खेचले आणि म्हणाली, डॅडी या दुकानात नाही जरा पुढे चला, असे म्हणून मला तिने तेथील अति पॉश आशा अॅपल फोनच्या दुकानात नेले. ती जागा कार शो रूमला लाजवेल अशी होती. माझी छाती धडकू लागली. माझी मुलगी आता माझ्या खिशाला चाट लावणार हे मला समजून चुकले. मला वाटले, तिला सांगावे,” अग भविष्यात तुला मी जे काही देणार आहे, त्यातील निम्मा हिस्सा तू गमवणार आहेस. मी तो विचार मनातच दाबून ठेवला. दुकानात मी प्रथम प्रवेश केल्यावर स्वागत सुंदरीने बळेबळे स्मित केले. पण ते खोटे होते हे निश्चितच . बहुधा तिला वाटले असेल की this old geezer will not buy anything here but waste salesman’s time. तेव्हडयात माझी मुलीने मला हाक मारून थांबण्यास सांगितले. ते बघताच स्वागत सुंदरीच्या चेहऱ्यावर मोठ स्मित पसरले, कारण माझी मुलगी खर्च करेल अशी तिला आशा वाटली असावी. तिने आम्हास एका विक्रेत्याकडे पाठवले. त्यानेही आमचे मोठे स्मित करून स्वागत केले. प्रथम त्याने आम्हास चहा, कॉफी, थंड गार काही हवे का विचारले, अगदी कार डिलरकडे अथवा पुण्याच्या साडीवाल्याकडे विचारतात तसे. ती ऑफर मुलीने धुडकवली पण मी मात्र स्वीकारली, कारण फुकटात असेल ते पदरी पाडावे या पिढीतील मी आहे. चहा फक्कड होता. मी दोन घोंट घेतल्यानंतर विक्रेता पहिला फोन मुलीला दाखवत म्हणाला, this a Cadilac ऑफ मोबईल. आणि मग ५/१० मिनिटे त्या गाडीतील/ माफ करा फोन मधील वैशिष्टे काय आहेत हे प्रात्यक्षित करून दाखवली. जणू कार विक्रेता डेमो कार ची चक्कर मारून दाखवतो तसे, गाडी असती तर ती चक्कर मी एंजॉय केली असती, पण फोनची माहिती माझ्या डोक्यावरून गेली. कन्या आणि माता यांनी मात्र यात विशेष रस घेतला होता. मी उगाचच ईकडे तिकडे बघत कुठे cadilac पेक्षा स्वस्त मॉडेल दिसते आहे का हे  पहात होतो. त्याही पेक्षा हुंडेचे मॉडेल मिळते का विचारात होतो. कन्या आणि मातेने माझ्याकडे पहिले, आणि यांना कळून चुकले की मी महागडा फोन घेणार नाही. मग मला त्या दोघी मराठीतून म्हणाल्या अहो आता तरी जरा हौस करा. किती काटकसर करायची, विक्रेत्याला भाषा जरी समजत नसली तरी त्यांच्या देहबोलीवरून त्या दोघी जे काही बोलतात हे त्याने ताडले, आणि त्याने यांच्यापुढे ती Cadilac पुनःनाचवत तिचे पुन्हा गुणगान सुरू केले. त्याला पत्नी आणि मुलगी दोघीही बळी पडल्या.

 मुलीने तिचे क्रेडिट कार्ड पुढे केले आणि म्हणाली हा फोन माझी तुम्हाला गिफ्ट समजा. मला हेनरी फोर्डची आठवण झाली, तो स्वत. कंजूस होता पण त्याचा मुलगा उधळ्या होता,त्या बाबत तो म्हणाला माझ्या मुलाचा बाप लक्षाधिश ( त्या काळी ) आहे त्यामुळे तो असे पैसे उडवू शकतो, पण माझा बाप नव्हता त्यामुळे मी जपून पैसे खर्च करतो. ते म्हणण्याचे धैर्य माझ्यात नाही. असो. Cadilac गळ्यात पडली. मग विक्रेत्याने त्यावर विमा,जादा gaurantee warranty कशी उपयोगी असते ही सांगितले, आणि विशेतह; teenagers आणि seniors साठी ही must आहे हेही प्रतिपादन केले. त्याचीही खरेदी झाली आणि फोन रूपी CADILLAC माझ्या ताब्यात आली. ही जर गाडी असती तर मी लगेचच चालवली असती पण या फोनसाठी, वीकएंडला माझ्या दोन मुली, त्यांचे दोन आय टी स्पेसिलिस्ट मित्र आणि नातू यांचेकडून ट्रेनिंग घ्यावे लागले. रोज काही तरी अडचण येत असे पण माझे सल्लागार मला तत्परतेने खुलासा करत. महिन्या दीड महिन्याने मी बऱ्या पैकी प्रगती केली आणि माझा आणि या फोनचा सोलो प्रवास सुरू झाला, त्यात अजूनही मी मधेमद्धे त्यांची मदत घेत असतो. त्यावर माझ्या थोडाफार काबू पण आला आहे, आणि मी या फोनच्या प्रेमात पडू लागलो आहे. इतकेच नाही तर मी तो मोठ्या दीमाख्याने माझ्या दोस्ताना माझी cadilac अभिमानाने दाखवतो. 

मार्च १ एसटी २०२५   

अजित कुकडे. 

४१६-२९३-०७८६ 

प्रहसन. आणि लेख.

Leave a Comment