MBM Toronto - साहित्य संमेलन 2021

मराठी साहित्यिकांना आग्रहाचं आमंत्रण  

गुढीपाडवा म्हटलं की पहिली आठवण येते टोरोंटो साहित्य संमेलनाची! आम्हाला माहिती आहे की दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्ही नवीन काहीतरी लिहून ते संमेलनात वाचण्याची वाट बघत आहात.
2020 च्या उत्तर अमेरिकेतील पहिल्या यशस्वी ऑनलाईन साहित्य संमेलनानंतर MBM Toronto घेऊन येत आहे 33 वे साहित्य संमेलन (ऑनलाईन).  
- संमेलनात भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तिकीट विकत घ्यावे. त्यानंतर आम्ही पुढील सूचना तुम्हाला ई-मेल ने पाठवू.  
- साहित्य प्रकाराची अट नाही. मात्रं साहित्य स्वतः लिहीलेले असावे
- राजकिय, धार्मिक, जातीय किंवा कुठल्याही प्रक्षोभक प्रकारचे साहित्य मान्य केले जाणार नाही. सगळ्या प्रेक्षकांना सहकुटुंब या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येण्याजोगे साहित्य निवडावे
- मागचं एक वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण गेलंय आणि अजूनही संकट संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर शक्य झाल्यास आशादायी आणि प्रेरणा किंवा आनंद देणारे विषय घ्यावेत (हा नियम नाही पण एक नम्र विनंती).  दुःखी, गंभीर किंवा निराशावादी विषयांवर बोलायला पुढची बरीच वर्षं आपल्याकडे आहेतच की!

- वयोमर्यादा - 18 वर्षांवरील
- व्हिडिओ 10 मिनिटांपेक्षा मोठा नसावा
- प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे व्हिडिओ पाठवावेत. एकाच व्हिडिओ मध्ये 2 वेगळे साहित्य प्रकार चालणार नाहीत
- व्हिडिओ मोबाईल वर बनवत असल्यास मोबाईल आडवा म्हणजे horizontal मोड मध्ये ठेवावा
- व्हिडिओच्या सुरुवातीला आपले नाव, गाव, देश, साहित्य प्रकार आणि साहित्याचे शीर्षक सांगावेत उदा. नमस्कार मी अ ब क, टोरोंटो, कॅनडाहून. आज तुमच्यासाठी माझी 'एका शहराची गोष्टं' ही कथा वाचणार आहे
- तुमच्या व्हिडिओ सोबत तुमचे पूर्ण नाव, गाव, देश, साहित्य प्रकार, फोन नंबर, एक फोटो अणि स्वतः बद्दल संक्षिप्त माहिती sahitya@mbmtoronto.com इथे  पाठवावी
- वेळेच्या मर्यादेमुळे आमच्याकडे येणारे पहिले 30 व्हिडिओ विचारात घेण्यात येतील
 - नियमांत नं बसणारे व्हिडिओ विचारात घेतले जाणार नाहीत
- साहित्य संमेलनासोबतच आपले साहित्य येत्या स्नेहबंध अंकात प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास, MS Word  मध्ये मराठी फॉन्ट वापरून साहित्य sahitya@mbmtoronto.com या पत्त्यावर पाठवावे
- MBM कमिटी चा निर्णय अंतिम राहील.
- वाचन होणाऱ्या लिखाणाची जबाबदारी संबंधित लेखकाची असेल. मराठी मंडळ आणि कार्यकारिणी समिती त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही

संम्मेलनाची तारीख : १०, ११ एप्रिल २०२१.
वेळ : संध्याकाळी ५ वाजता
व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख - १० मार्च २०२१

साहित्यिक म्हणून भाग घेण्यासाठी प्रवेश फी - $१० (जमा केलेला निधी हॉस्पिटल्स आणि फूड बॅंक्स ना देण्यात येईल)
 
हा कार्यक्रम फेसबुक आणि युट्युब वर प्रदर्शित केला जाणार आहे आणि प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.
संमेलनाचे प्रक्षेपण -
फेसबुक - https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup
युट्युब - https://www.youtube.com/channel/UCFiqVKB9ikZtmpA6HGPSfig

चला तर मग, लागा तयारीला. लवकरात लवकर तुमच्या साहित्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवा.

MBM Toronto