
नमस्कार मंडळी ,
सर्व मराठी साहित्यिकांना आग्रहाचं आमंत्रण!
मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो खास मराठी साहित्य प्रेमींसाठी साहित्य संमेलन आयोजित करत आहे,
“३५ वे साहित्य संमेलन”
आम्हाला माहिती आहे की दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्ही नवीन काहीतरी लिहून ते संमेलनात वाचण्याची वाट बघत आहात. ह्या वर्षीचे साहित्य संमेलन ऑनलाईन स्वरूपाचे असेल.
संमेलनाची तारीख : २५ मार्च २०२३.
वेळ : संध्याकाळी ५ वाजता
व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख – १० मार्च २०२३
साहित्यिक म्हणून भाग घेण्यासाठी प्रवेश फी –
MBM Members : निःशुल्क
Non-Members : $५
(जमा केलेला निधी हॉस्पिटल्स आणि फूड बॅंक्स ना देण्यात येईल)
प्रवेश फी येथे भरा –https://www.tugoz.com/streams/mbm/sahitya-sammelan-2023
हा कार्यक्रम फेसबुक आणि युट्युब वर प्रदर्शित केला जाणार आहे आणि प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.
संमेलनाचे प्रक्षेपण:
फेसबुक – https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup
युट्युब – https://www.youtube.com/channel/UCFiqVKB9ikZtmpA6HGPSfig
- संमेलनात भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तिकीट विकत घ्यावे. त्यानंतर आम्ही पुढील सूचना तुम्हाला ई-मेल ने पाठवू.
https://www.tugoz.com/streams/mbm/sahitya-sammelan-2022 - साहित्य प्रकाराची अट नाही. मात्रं साहित्य स्वतः लिहीलेले असावे
- राजकिय, धार्मिक, जातीय किंवा कुठल्याही प्रक्षोभक प्रकारचे साहित्य मान्य केले जाणार नाही. सगळ्या प्रेक्षकांना सहकुटुंब या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येण्याजोगे साहित्य निवडावे.
- वयोमर्यादा – 18 वर्षांवरील
- व्हिडिओ 10 मिनिटांपेक्षा मोठा नसावा
- प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे व्हिडिओ पाठवावेत. एकाच व्हिडिओ मध्ये 2 वेगळे साहित्य प्रकार पाठवू नयेत.
- व्हिडिओ मोबाईल वर बनवत असल्यास मोबाईल आडवा म्हणजे horizontal मोड मध्ये ठेवावा.
- व्हिडिओच्या सुरुवातीला आपले नाव, गाव, देश, साहित्य प्रकार आणि साहित्याचे शीर्षक सांगावेत उदा. नमस्कार मी अ ब क, टोरोंटो, कॅनडाहून. आज तुमच्यासाठी माझी ‘एका शहराची गोष्टं’ ही कथा वाचणार आहे
- तुमच्या व्हिडिओ सोबत तुमचे पूर्ण नाव, गाव, देश, साहित्य प्रकार, फोन नंबर, एक फोटो अणि स्वतः बद्दल संक्षिप्त माहिती
sahitya@mbmtoronto.com येथे पाठवावी - वेळेच्या मर्यादेमुळे आमच्याकडे येणारे पहिले १५ व्हिडिओ विचारात घेण्यात येतील
- नियमांत नं बसणारे व्हिडिओ विचारात घेतले जाणार नाहीत
- MBM कमिटी चा निर्णय अंतिम राहील.
- वाचन होणाऱ्या लिखाणाची जबाबदारी संबंधित लेखकाची असेल. मराठी मंडळ आणि कार्यकारिणी समिती त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही
आपल्या साहित्य संमेलनाचे प्रायोजक आहेत- श्री जयंत देशपांडे Jayant Deshpande
त्यांचे खूप आभार !
चला तर मग, लागा तयारीला. लवकरात लवकर तुमच्या साहित्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवा.