MBM Toronto | मातृभाषा - मायमराठी स्पर्धा

नमस्कार मंडळी

कसे आहेत ? सातत्याने लागू असलेल्या विविध प्रतिबंधांमुळे नक्कीच वैतागला असाल ना?

त्यात पुन्हा मुलांची उन्हाळ्याची सुट्टी आणि त्याचे नियोजन याचे आव्हान समोर आहेच.

कॅनडात राहत असतांनाही, आपल्या मुला - मुलींमधील सळसळते चैतन्य जपत त्यांच्यावर आपल्या मातृभाषेचे संस्कार तुम्ही करताच.

Consulate General of India आणि मराठी भाषिक मंडळ, टोरांटो आयोजित करत आहे - विशेष ऑनलाईन स्पर्धा.

मातृभाषा - मायमराठी स्पर्धा

स्पर्धा प्रकार:

१. श्लोक पठण  - मनाचे श्लोक
२. कथाकथन
३. गम्मत गाणी / कविता व बडबडगीते

स्पर्धेविषयी अधिक माहिती:

- या स्पर्धेत कॅनडा मध्ये राहणारे ४ - १८ वयोगटातील सर्व मराठी मुले-मुली सहभाग घेऊ शकतात.
- प्रवेश विनामूल्य आहे
- स्पर्धेच्या नियमांचे पालन करीत, प्रत्येक स्पर्धेकरिता वेगवेगळे व्हिडिओ अपेक्षित आहेत.  
- स्पर्धक एका पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतो.
- स्पर्धे करता पाठवण्यात आलेले व्हिडिओ स्पर्धा संपे पर्यंत अन्यत्र कोठेही पाठवू नये, अन्यथा स्पर्धकाला बाद करण्यात येईल.
- नियमात न बसणारे व्हिडिओ विचारात घेतले जाणार नाहीत.
- स्पर्धा १८ वर्ष खालील मुला - मुलींकरिता आहे याची जाणीव ठेवत, बालवयातील निरागसता जपणारे, आनंदी, हलके-फुलके (सकारात्मक बालसुलभ), साहित्य, कथा, गाणी व कविता पालकांनी मुलांना उपलब्ध करून द्यावेत.
- मातृभाषा MBM कमिटीचा निर्णय अंतिम राहील.

फॉर्म पाठवण्याची अंतिम तारिख: 25 June 2021

स्पर्धेसाठी दिलेल्या व्हिडिओची संपूर्ण जबाबदारी पालकांची असेल आणि मराठी भाषिक मंडळ व कमिटी त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या Link वर जाऊन Google Form submit करा.

https://bit.ly/3cgSDA5

सर्व मुलांना शुभेच्छा !!

Matrubhasha.pdf